अभिकल्पना २०१९


'अभिकल्पना २०१९' च्या व्यासपीठावरून जेष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना गजलनवाज भीमराव पांचाळे दादा यांच्या हस्ते 'अभिकल्पना २०१९ जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सोबत सुप्रसिद्ध लेखिका वंदना खरे,अभिनेत्री आशा ज्ञाते,श्रीमती गीता भीमराव पांचाळ. 


 कार्यक्रमाची सांगता जेष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या सुमधुर आवाजातील 'इतनी शक्ती हमें दे ना दाता...' या गीताने झाली.

'अभिकल्पना २०१९' व्यासपीठावर मान्यवर पद्मश्री भावना सोमय्या (राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित,२०१७), अवघ्या काळात तरुणाईच्या हृदयावर 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' या गाण्याने राज्य करणारी सुप्रसिद्ध गायिका शुभांगी केदार,सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका/नाटककार वंदना खरे आणि अभिनेत्री आशा ज्ञाते (माई) यांना जेष्ठ गायिका पुष्पां पागधरे आणि जेष्ठ लेखक / प्रकाशक रामदास भटकळ (पॉप्युलर प्रकाशन,मुंबई) यांच्या शुभहस्ते 'अभिकल्पना २०१९ विशेष पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले त्यातील काही क्षण...











'अभिकल्पना २०१९' मध्ये प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस ठरलेल्या सत्रातील दोन विशेष सत्र

'थांब ग सुमा...' हे पाहिले नाट्य सादरीकरण केले ते संगणकशास्त्र विभाग ,मुंबई विद्यापीठ, कलिना महिला कर्मचारी-विद्यार्थिनी समूह,लेखन-डॉ.अंबुजा साळगावकर (विभाग प्रमुख,संगणकशास्त्र विभाग,मुंबई विद्यापीठ), गीत-संगीत श्री ओंकार बर्वे सर (सहाय्यक प्राध्यापक,संगणक शास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ)

सुप्रसिद्ध लेखिका वंदना खरे यांनी भाषांतरीत केलेलं 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी...' या नाटकातील अल्प अंश सोबत अभिनेत्री मुक्ता खरे...उपस्थित प्रेक्षकांनी शेवटपर्यंत थांबून नाटकातील अंश एन्जॉय केलं.


अभिवाचन सत्रात दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री ('मुंबई-पुणे-मुंबई-३' आणि नाटक 'ठष्ट' फेम) आशा ज्ञाते (माई) यांनी यावर्षीही अभिवाचन सत्रात आपल्या अभिवाचनातून आपल्या अभिनयातून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली आणि मुक्त हास्याचा अनुभव दिला...

 'अभिकल्पना २०१९' याही वर्षी आपल्या नृत्याच्या देखण्या आणि विलोभनीय शैलीने प्राजक्ताने कार्यक्रमात रंगत आणली. यावर्षी तिने सादर केल्याला 'विठोबा चला मंदिरात...' या गीतातील विशेष 'अभंग नृत्य शैली' ने उपस्थितांना मनमोहून टाकले. 

'सुमानंजली हे नृत्य सादरीकरणाऱ्या चिमुरड्या छोट्या नर्तिका कार्यक्रमात आपल्या नृत्याने आणि चाफ्याच्या फुलाने कार्यक्रमाचे वातावरण दरवळून आणि प्रसन्न करून टाकतात...आणि कार्यक्रम सादरीकरणात सकारात्मकता निर्माण होते...

     नताशा आणि टीमने या वर्षी अतिशय सुंदर आणि वेगळी भरतनाट्य नृत्य शैली 'दशावतार' सादर केली
आणि प्रेक्षकांना आपल्या नृत्याने भुरळ घातली...


'अभिकल्पना' च वेगळपण जर काही असेलच तर ते म्हणजे दरवर्षी कार्य्रमात (ऑड डे सुद्धा) वेळात वेळ काढून आपल्या उपस्थितीने सहभागी होणारा सृजनशील आणि कला-साहित्य रसिक प्रेक्षकवर्ग... आम्हासर्वांचं एकचं उद्द्येश असतो कि एकही जरी प्रेक्षक आला तरी कार्यक्रम करायचा कारण अभिकल्पनेला उपस्थित असलेला एक प्रेक्षकही शंभर प्रेक्षकांबरोबर असतात आम्हाला...गर्दी नसली तरी दर्दी मात्र हमखास आवर्जून उपस्थित होतातच... निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास लाभलेले मुख्य अतिथी ,प्रमुख पाहुणे, आप्तेष्ट, मित्र परिवार,नाविन्याची आवड आणि ध्यास असलेले कलाप्रेमी आणि नव्याने ओळख झालेले मित्र मैत्रिणी यासर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा येते आणि हेच अभिकल्पना पर्वाच विलोभनीय सौन्दर्य असत...यामुळेच नेहमीप्रमाणे यंदाचा 'अभिकल्पना २०१९' कार्यक्रम यशस्वी होऊ शकला... आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार !!! 





Comments

Popular posts from this blog

अभिकल्पना २०१८ क्षणचित्रे