अभिकल्पना २०१९
'अभिकल्पना २०१९' च्या व्यासपीठावरून जेष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना गजलनवाज भीमराव पांचाळे दादा यांच्या हस्ते ' अभिकल्पना २०१९ जीवनगौरव पुरस्कार ' प्रदान करण्यात आला. सोबत सुप्रसिद्ध लेखिका वंदना खरे,अभिनेत्री आशा ज्ञाते,श्रीमती गीता भीमराव पांचाळ. कार्यक्रमाची सांगता जेष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या सुमधुर आवाजातील ' इतनी शक्ती हमें दे ना दाता ...' या गीताने झाली. 'अभिकल्पना २०१९' व्यासपीठावर मान्यवर पद्मश्री भावना सोमय्या (राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित,२०१७) , अवघ्या काळात तरुणाईच्या हृदयावर 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' या गाण्याने राज्य करणारी सुप्रसिद्ध गायिका शुभांगी केदार,सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका/नाटककार वंदना खरे आणि अभिनेत्री आशा ज्ञाते (माई) यांना जेष्ठ गायिका पुष्पां पागधरे आणि जेष्ठ लेखक / प्रकाशक रामदास भटकळ (पॉप्युलर प्रकाशन,मुंबई) यांच्या शुभहस्ते 'अभिकल्पना २०१९ विशेष पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले त्यातील काही क्षण... 'अभिकल्पना २०१९'...



Comments
Post a Comment